Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : अपघात रोखण्यासाठी प्रशासन सरसावले, खबरदारी म्हणून 'ही' पावलं उचलणार

नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होऊन पंधरवडाही उलटला नाही, मात्र दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे.

डॉ. माधव सावरगावे

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आता ब्लॅक स्पॉट शोधून प्रवाशांना सतर्क केलं जाणार आहे. नागपूर (Nagpur) ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होऊन पंधरवडाही उलटला नाही, मात्र दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे. पंधरवड्याच्या आत जवळपास ३० पेक्षा अधिक लहान-मोठे अपघात घडले आहेत.

त्यामुळे रस्ते विकास महामंडळ अधिक सतर्क झाले असून, हे अपघात रोखण्यासाठी धोकादायक वळण आणि ब्लॅक स्पॉटची शहानिशा करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सतत होणारे अपघात (Accident) रोखण्यासाठी, गरज पडल्यास अन्य महामार्गावर ज्या पद्धतीने ब्लॅक स्पॉट असतात. (Latest Maharashtra News)

या मार्गावर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जेथे धोकादायक वळण आहेत, तेथे या आधीच सूचना फलक बसिवले आहेत. परंतु तरीही अपघात होत असल्याने त्याची कारणे शोधली जाणार असत अपघातरोखण्यासाठी, गरज पडल्यास अन्य महामार्गावर ज्या पद्धतीने ब्लॅक स्पॉट असतात. तसे येथेही शोधून अपघात कमी करण्याचे प्रयत्न विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

समृद्धी महामार्गाची वैशिष्टये -

• लांबी ७०१ किमी

• एकूण जमीन : ८३११ हेक्टर

• रुंदी : १२० मीटर • इंटरवेज : २४

• अंडरपासेस : ७००

• उड्डाणपूल : ६५

• लहान पूल : २९४

• वे साईड अमॅनेटीझ : ३२

• रेल्वे ओव्हरब्रीज : ८

• द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड)

• द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष

• कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२

• प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये

• एकूण लाभार्थी : २३ हजार ५००

• वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये

• कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६

• द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत

• ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

SCROLL FOR NEXT