airplane saam tv
महाराष्ट्र

Good News: तिरुपती- शिर्डी विमान सेवेस प्रारंभ; आठवड्यातून तीन दिवस सेवा

ही विमान सेवा सुरु झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

साम न्यूज नेटवर्क

- गाेविंद साळुंके

शिर्डी : तिरुपती ते शिर्डी विमान (tirupati shirdi flight) सेवा सुरू झाली आहे. तिरुपती (tirupati balaji) वरून शिर्डीला (shirdi) येणारे पहिले विमान शिर्डी विमानतळावर (shirdi airport) दाखल झाल्यावर काकडी ग्रामस्थ आणि विमानतळ टॅक्सी चालक- मालक संघटनेच्या वतीने विमानात आलेल्या भाविकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. (tirupati shirdi flight latest news)

गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डी तिरुपती विमान सेवा सुरू करण्याची मागणी भाविक करत होते. आता ही सेवा सुरू झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. सुरुवातीला मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान शिर्डी ते मुंबई (mumbai) विमान सेवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. ही विमानसेवा सुरू करण्याची मागणी भाविकांमधून होत आहे. यापुर्वी मुंबई- शिर्डी विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ही विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यास भविकांना शिर्डीत येण्यास अधिक सुलभ हाेईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT