तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या या बड्या नेत्याचे नाव
तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या या बड्या नेत्याचे नाव Saam Tv
महाराष्ट्र

तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या या बड्या नेत्याचे नाव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी काल आंध्रप्रदेश सरकारने जाहीर केली आहे. या यादीत देशभरातून २४ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून, नियुक्त करण्यात आले आहे. देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित असे आंध्रप्रदेशातील तिरूमला येथील तिरुपती देवस्थानाची ख्याती आहे.

हे देखील पहा-

या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. मात्र, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधून ही नियुक्ती सूचवत असतात. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून संवाद साधुन महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर केली आहे.

त्याप्रमाणे काल आंध्रप्रदेश सरकारने अधिकृत अधिसूचना काढत, नवी तिरूमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर याआधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) गवर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा आहेच. त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून, मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर याचे वलय आता देश पातळीवर विस्तारल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी थोड्याच वेळात मतदान

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

SCROLL FOR NEXT