Nashik News Tabrez Shaikh Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: पोलिसांच्या जाचाला कंटाळून सराफ व्यवसायिकाने संपवलं जीवन; नाशिकमधील हृदय हेलावणारी घटना

पोलिसांच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवल्याचं त्यांच्या कुटुंबियांच म्हणणं आहे.

Ruchika Jadhav

तबरेज शेख

Nashik: नाशिक शहरामधून एक दु:खद घटना समोर आली आहे. नाशिकरोड येथील सराफ व्यावसायिकाने घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. या व्यक्तीने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आपले जीवन संपवल्याचं त्यांच्या कुटुंबियांच म्हणणं आहे. (Latest Nashik News)

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार लोखंडे मळा नाशिकरोड येथे ही घटना उघडकीस आली. दिपक कमळकर दुसाने (वय २९) असं या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे.चोरीचे सोने विकत घेतल्याच्या संशयातून ठाणे ग्रामीण पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले होते.

यातून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.या बाबत उपनगर पोलिस ठाण्यात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपक हे एक सराफ व्यवसायिक होते. नाशकात सोने चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे दिपक यांनी चोरीचं सोनं विकत घेतलं आहे असा संशय पोलिसांना होता.

त्यामुळे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. या घटनेने दिपक दुखावले गेले. त्यांना चोरीचे सोने घेतले नव्हते. मात्र तरी देखील त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी करण्यात आली याचे त्यांना फार वाईट वाटले. तसेच आपली बदनामी झाल्याची भावना त्यांच्या मनात आली. त्यामुळेच त्यांनी आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं कुटुंबियांच म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT