यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ Saam Tv
महाराष्ट्र

यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ

शेतकऱ्यांच्या पोरांनी वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी धोंड्या काढून धोंडीधोंडी पाणी दे म्हणत दारोदार भटकंती सुरू केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ: धोंडीधोंडी पाणी दे..!  मृगनक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराज्याने पेरण्या उरकल्या मात्र विदर्भात माॅन्सूनचा पत्ता नसुन आद्राच्या पावसानेसुध्दा दडी मारल्याने बळीराजा आसमानी संकटात सापडला आहे. त्यामुळे त्याच्यावर दुबार पेरणी करावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या पोरांनी वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी धोंड्या काढून धोंडीधोंडी पाणी दे म्हणत दारोदार भटकंती सुरू केली आहे.

कमरीला कडूनिंबाच्या फांद्या हातात मुसळ व त्याच्या मधोमध भलेमोठे बेंडूक बांधून डफडीच्या तालावर नाचायचे आणी धोंडीधोंडी पाणी दे धोंडीचे दिवस पाणी मोठ हिवस धोंडी आली दारात अन पाऊस आला जोरात असे, लोकगीत म्हणून शेतकऱ्याची पोरं वरून राज्याला प्रसन्न करण्याची धडपड करीत आहेत. तर नागरिकही पाऊस येण्यासाठी धोंडीवर पाण्याचा वर्षाव करीत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये सुरुवातीच्या टप्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. परंतू गेली ८ दिवस झाले पावसाने पाठ फिरवल्याचं दिसत आहे. हवामान खात्याने यावर्षी 100 टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. परंतू आता पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी संंकटात अडकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT