MLA. Ravi Rana अरुण जोशी
महाराष्ट्र

वेळ आल्यास ईडी, सीबीआयकडे जाणार पण अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना तुरुंगात टाकणार- आ. रवी राणा

पोलीस आयुक्त आरती सिंह यांना तुरुंगात टाकणार असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले

अरुण जोशी

अमरावती: वेळ पडल्यास ईडी किंवा सीबीआयकडे जाणार पण पोलीस आयुक्त आरती सिंह यांना तुरुंगात टाकणार असे वक्तव्य आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी केले आहे. आरती सिंह यांनी भ्रष्टाचार (Corruption) केला आहे, खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. आरती सिंह या अमरावती शहर पोलीस आयुक्त आहेत. रवी राणा म्हणाले की, अमरावतीमध्ये (Amravati) आरती सिंह यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. पैसे घेऊन गुन्हेगारांशी सेटलमेंट त्या करत आहेत. या अगोदर त्यांनी ज्या- ज्या ठिकाणी काम केले आहे. त्या त्या ठिकाणी देखील असाच भ्रष्टाचार केला आहे.

हे देखील पहा-

माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर जो गुन्हा दाखल करायचा आहे तो दाखल करा, त्याला उत्तर मी देणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जो काही भ्रष्टाचार सुरू आहे. त्याच्या विरोधामध्ये मी पंतप्रधान, गृहमंत्री सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) तसेच ईडी किंवा सीबीआयकडे जाणार आहे, पण आरती सिंह यांना तुरुंगामध्ये टाकणार आहे. अमरावती महापालिका (Municipal Corporation) आयुक्तांवर गेल्या महिन्यात शाईफेक करण्यात आली होती. या शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार रवी राणा यांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण या प्रकरणी युवा स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांवर ठेवण्यात आलेला आरोप सिद्ध झाला आहे.

अमरावती पोलीस आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये एक प्रकारचा वाद सुरू असल्याचे दिसत आहे. खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांच्या विरोधामध्ये संसदेत हक्कभंग दाखल केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून अमरावती पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त, अमरावती यांना ६ एप्रिल दिवशी लोकसभा सचिवालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह आणि अमरावतीचे तत्कालीन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT