TIGER SHROFF FIRING CASE: VIRAL POST CLAIMS BISHNOI GANG LINK saam tv
महाराष्ट्र

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Case Latest News in Mumbai: अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर अनिल पंडित आणि हरमन संधू यांच्या नावाने एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये बिश्नोई गँगचा उल्लेख आणि सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर मुंबईतील जुहूमध्ये गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये अनिल पंडित आणि हर्मन संधू यांनी गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच या दोघांच्या नावापुढे बिश्नोई गँग असा उल्लेख असल्याने बॉलीवूडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

व्हायरल पोस्टमध्ये अभिनेता सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना धमकी देण्यात आल्याचे दिसून येत आहे. सलमान खानसोबत जो काम करेल, त्याचा पुढचा नंबर असेल, अशा आशयाचा मजकूर या पोस्टमध्ये लिहिला आहे. तसेच या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली का? असा सवाल या पोस्टमुळे उपस्थित होत आहे.

पोस्टमध्ये नेमके काय लिहिलंय?

व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, जय महाकाल… जय श्रीराम! टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी स्वीकारली आहे. आम्ही त्याला बोलावून समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने ऐकले नाही. त्यामुळे आज आमच्या पद्धतीने त्याला समजावून सांगितले. चित्रपटसृष्टीत जो कोणी आमचे ऐकणार नाही किंवा सलमान खानसोबत काम करेल, त्याचा पुढचा नंबर असेल, असा इशारा या पोस्टमधून देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

Anil Pandit and Harman Sandhu viral post controversy

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पोलिस आयुक्तांना फोन

दरम्यान या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना फोन करून अभिनेते टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती घेतली. पोलिस आयुक्तांना त्यांनी तत्काळ वेगाने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT