विवाहितेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणं गुन्हाच; नागपूर खंडपीठाचा निकाल Saam Tv
महाराष्ट्र

विवाहितेच्या अंगावर प्रेमपत्र फेकणं गुन्हाच; नागपूर खंडपीठाचा निकाल

अकोला जिल्ह्यातील एका विनयभंगाच्या घटनेबाबद निर्णय देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केलं आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - ‘विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ असं लिहिलेलं किंवा प्रेम व्यक्त करणारी कविता, शायरी लिहिलेला कागद फेकणे’ हा विनयभंगच असल्याचा महत्त्वपूर्व निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर Nagpur खंडपीठाने दिला आहे. अकोला Akola जिल्ह्यातील एका विनयभंगाच्या घटनेबाबद निर्णय देताना न्यायालयाने Court हे मत व्यक्त केलं आहे.

हे देखील पहा -

२०११ साली अकोला जिल्हयात मध्ये घडलेल्या घटनेत, एका ४५ वर्षीय महिलेने एका ५४ वर्षीय पुरुषावर विनयभंग करून तिला धमक्या देण्याचा आरोप केला होता. पीडित महिला ही विवाहित असून तिला एक मुलगा देखील आहे.

आरोपीने या पीडित महिलेला एक प्रेमपत्र दिलं होतं आणि त्या महिलेने प्रेमपत्र घेण्यास नकार दिल्यावर, त्याने ही चिठ्ठी तिच्या अंगावर फेकली आणि ‘आय लव्ह यू’ म्हणाला होता. या प्रकरणी एखाद्या ४५ वर्षीय विवाहितेच्या अंगावर प्रेम व्यक्त करणारी कविता लिहिलेली चिठ्ठी फेकणे हा विनयभंगच आहे,’ असं न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवलं

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

SCROLL FOR NEXT