Three People died in accident saam tv
महाराष्ट्र

धुळे-शिंदखेडा रस्त्यावर विचित्र अपघात, तीन जणांचा मृत्यू, एक जण गंभीर

धुळे-शिंदखेडा रस्त्यावर एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळे-शिंदखेडा रस्त्यावर एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे. तिहेरी अपघातात तीन जणांचा मृत्यू (three people died) होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. ट्रॅक्टर,ट्रक व दुचाकी या तीन वाहनांमध्ये (dhule accident news) विचित्र अपघात झाला. दुचाकी चालकाचा ट्रॅक्टर आणि ट्रकमध्ये चिरडलं गेल्यानं जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. या गंभीर घटनेची दोंडाई पोलिसांनी (police investigation) दखल घेतली असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-शिंदखेडा रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात झाल्याने तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या रुग्णाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाहने एकाच मार्गाने जात असताना ट्रॅक्टर अचानक थांबल्याने मागून येणारी दुचाकी ट्रॅक्टरवर धडकली.

त्यानंतर पाठामागून भरधाव वेगानं येणारा ट्रक दुचाकी आणि ट्रॅक्टरला जाऊन धडकला. त्यामुळे हा विचित्र तिहेरी अपघात झाला. हा अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने पळ काढला आहे. दोंडाईचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT