आंग्रेंच्या गोकुळाष्टमीला तीनशे वर्षाची परंपरा... राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

आंग्रेंच्या गोकुळाष्टमीला तीनशे वर्षाची परंपरा...

आंग्रेंचे नववे वंशज आजही करीत आहेत उत्सव साजरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड -  सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या जन्मापासून सुरू झालेला श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाला तीनशे वर्षाची परंपरा आहे. कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे आजही गोकुळाष्टमी आणि कानिफनाथ उत्सव उत्साहात साजरा करतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे नियमांचे पालन करून गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. आंग्रे वाड्यात मानाची दहीहंडी फोडल्यानंतर अलिबागेत दहीहंडी फोडली जाते. ही परंपरा तीनशे वर्षांपासून सुरू आहे.

तुकोजी आंग्रे आणि बिंबाबाई आंग्रे या दाम्पत्यांना विवाहानंतर अनेक वर्षे मूल झाले नव्हते. यासाठी त्यावेळेच्या रितीरिवाजानुसार नगर जिल्ह्यातील मढी येथील कानिफनाथ स्थानावर आंग्रे दाम्पत्यांनी नवस केला. कानिफनाथ यांच्या प्रसादातून आंग्रे दाम्पत्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. तेच मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे.

हे देखील पहा -

आंग्रे यांचे पूर्वश्रमीचे आडनाव हे संकपाळ होते. कानिफनाथ यांच्या अंगऱ्यातून आपला वंश सुरू झाल्याने तुकोजी आणि बिंबाबाई यांनी आपल्या घराण्याला आंग्रे आडनाव लावले. तर कानिफनाथ यांच्या कृपा प्रसादाने झालेला मुलगा म्हणून त्याचे नाव कान्होबा किंवा कान्होजी ठेवले गेले. कान्होजी आंग्रे यांच्या जन्मापासून आंग्रे वाड्यात गोकुळाष्टमी आणि कानिफनाथ उत्सव हा एकाच दिवशी साजरा केला जातो.

अलिबाग शहरातील आंग्रे वाड्यात उत्साहात गोकुळाष्टमी आणि कानिफनाथ उत्सव साजरा केला जात होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी आंग्रे यांच्या घेराई या नव्या बंगल्यात आंग्रेंचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे  आणि मोजक्या व्यक्तीच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा करण्यात आला. आंग्रे यांना पहिली दहीहंडी फोडण्याचा मान असल्याने आंग्रे वाड्यात हंडी फोडल्यानंतर अलिबागेत दहीहंडी फोडण्यास सुरुवात होते. ही परंपरा आजही तीनशे वर्षांपासून सुरू आहे. श्रीकृष्ण जन्म उत्सव साजरा केल्यानंतर दुसरा दिवस हा गोपाळ काला म्हणून साजरा होत असतो. यादिवशी अलिबाग शहरातील मेतपाडा येथील कानिफनाथ मठातून पालखी आंग्रे वाड्यात येत असते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT