three government employees injured in road accident saam tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhajinagar Crime News : कोऱ्हाळे फाट्यानजीक अपघातात गाडीचा चक्काचूर, तहसील कार्यालयातील तिघे जखमी

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Siddharth Latkar

- Ramu Dhakne

Chhatrapati Sambhajinagar News :

कार्यालयीन कामकाज संपवून सिल्लाेडला (sillod) निघालेल्या शासकीय वाहनाचा झालेल्या अपघातात तहसिल कार्यालयातील तिघे कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर (sambhajinagar accident news) जिल्ह्यात घडली. या घटनेतील जखमी झालेल्यांना सिल्लाेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Maharashtra News)

या अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी : छत्रपती संभाजीनगर सिल्लोड मार्गावर केऱ्हाळा फाटा जवळील पेट्रोल पंप समोर हा अपघात झाला. तहसील कार्यालयाचे वाहन एका उभ्या असलेल्या वाहतुकीच्या वाहनास धडकले. यामध्ये तिघेजण जखमी झाले.

या तिघांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेत वाहन चालक कयूम देशमुख, कोतवाल राजीव बसेय्या आणि वसीम शेख अशी जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हे तिघे जण कार्यालयीन कामकाज आटोपून छत्रपती संभाजीनगरकडून सिल्लोडकडे येत होते. यादरम्यान उभे असलेल्या वाहनास पाठीमागून त्यांचे वाहन धडकल्याने जीपच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT