Covid 19  
महाराष्ट्र

आफ्रिकेतून फलटणला आलेल्या तिघांना काेविडची लागण; प्रकृती स्थिर

नागरिकांनी काेविड १९ च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असे आवाहन डाॅ. चव्हाण यांनी केले आहे.

ओंकार कदम

सातारा : परदेशातून आलेल्या सहापैकी तिघांना काेविड १९ ची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान आज (मंगळवार) संबंधितांचे नमुने हे आेमिक्राॅनच्या तपासणीसाठी (genome sequencing) पाठविण्यात येणार आहेत. सातारकर (satara) नागरिकांनी काेविड १९ प्रतिबंधक लसीचे डाेस पुर्ण करावेत असे आवाहन डाॅ. चव्हाण यांनी केले आहे.

डाॅ. चव्हाण म्हणाले फलटण येथे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड येथून आलेल्या सहा परदेशी प्रवाशांचे नमुने साेमवारी (ता.१३) जिल्हा रुग्णालयात तपासण्यात आले. त्यापैकी दक्षिण आफ्रिका येथून आलेल्या तिघांना काेविड १९ ची लागण झाल्याची माहिती समाेर आली आहे.

फलटण येथे दक्षिण आफ्रिकेतून आलेले चार प्रवासी उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी तिघांना काेविड १९ ची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णांमध्ये कोणतेही चिन्ह लक्षणे नाहीत व साच्युरेशन ९९ टक्के आहे असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी नमूद केले. नागरिकांनी काेविड १९ च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असे आवाहन डाॅ. चव्हाण यांनी केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

SCROLL FOR NEXT