Accident News saam tv
महाराष्ट्र

Buldhana Accident: ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; तिघा भावांचा जागीच मृत्यू

अपघातात तिघे भाऊ जागीच ठार झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संजय जाधव

Buldhana Accident News: बुलढाण्यातील नांदुरा - मोताळा मार्गावरून अपघाताची मोठं वृत्त हाती आलं आहे. बुलढाण्याच्या नांदुरा - मोताळा मार्गावर दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तिघे भाऊ जागीच ठार झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाण्यातील नांदुरा - मोताळा मार्गावर दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे जण ठार झाले आहेत. या मृतात दोन भाऊ तर तिसरा चुलत भाऊ आहे.

तिघा भावांचा जागीच मृत्यू

नांदुरा - मोताळा मार्गावरील तिघां भावांची नावे समोर आली आहे. उमेश कांडारकर , प्रशांत कांडारकर आणि नितीन कांडारकर अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. हे तिघेही मृतक मलकापूर तालुक्यातील झोडगा गावचे रहिवासी आहेत. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

नेमका अपघात कसा झाला?

बुलढाण्यातील नांदुरा - मोताळा मार्गावरल ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तिघा भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT