Ntin Gadakari Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari : बेळगावातून नितीन गडकरींना धमकीचा फोन; पोलिसांनी लावला कॉल करणाऱ्या 'त्या' गँगस्टरचा छडा

कॉलरपर्यंत पोहोचले पोलीस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagpur Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काल जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणात आता नागपूर पोलिसांना मोठी माहिती समोर आली आहे. गडकरी यांना आलेला फोन हा दुबई नाही तर बेळगाव तुरुंगातून आला आहे.

फोन करणारा व्यक्ती एका सराईत गँगस्टर असल्याची माहित आहे. हा गुन्हेगार सध्या बेळगावातील (Belagum) तुरुंगामध्ये शिक्षा भोगत आहे. जयेश पुजारी असे या सराईत गँगस्टरचे नाव आहे. त्यानं अवैधरित्या फोनचा वापर केला आणि गडकरींच्या (Nitin Gadkari) कार्यालयात फोन करून धमकी दिल्याची माहिती दिली.

या धमकी प्रकरणात एकटा जयेश पुजारी आणि त्याची टोळी आहे की अंडरवर्ल्डचे काही मोठे गँगस्टर यामागे आहेत, याचा तपास सध्या पोलीस करत आहे. शिवाय जयेशने तुरुंगातून अशाच पद्धतीने अनेक वेळा पूर्वी ही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. पुढील तपासासाठी नागपूर (Nagpur) पोलिसांची एक टीम तातडीने बेळगावला रवाना झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT