'हा' चोर चोरतो रुग्णवाहिकेतील सामान ! हेल्थ कॅान्शियस चोराची चर्चा अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

'हा' चोर चोरतो रुग्णवाहिकेतील सामान ! हेल्थ कॅान्शियस चोराची चर्चा

मात्र भंडाऱ्यात एका चोराने चक्क रुग्णवाहिकेतील थर्मामीटर, स्ट्रेसस्कोप चोरुन नेले आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा: आता पर्यंत आपण अनेक चोरीचे प्रकार पाहिले असतील. गाड्या, दागीने, मौल्यवान वस्तु, पैसे आदि च्या चोरीच्या घटना आपन नेहमी ऐकत असतो. मात्र भंडाऱ्यात एका चोराने चक्क रुग्णवाहिकेतील थर्मामीटर, स्ट्रेसस्कोप चोरुन नेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ह्या हेल्थ कॉन्शियस चोराची चर्चा सुरु झाली आहे.

हा सपूर्ण प्रकार भंडारा जिल्ह्याच्या तुमसर उपजिल्हा रुग्णालयात घडला असून येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात समोर उभी ठेवलेल्या रुग्णवाहिकेतून एका अज्ञात चोराने ग्लूको मीटर, थर्मामीटर, स्ट्रेसस्कोप, नेबुलाइजर, पल्स ऑक्सिमिटर, लरिगो स्कोप इत्यादि 18 हजार 550 रूपयाच्या वस्तु चोरुन नेल्या आहे. या प्रकरणी तुमसर पोलिसात रुग्णालय प्रशासनाच्या वतीने तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

कोरोना दरम्यान ग्लूको मीटर, थर्मामीटर, पल्स ऑक्सिमिटर यांची खरेदी लोक हेल्थ कॉन्शियस झाल्यावर वाढली आहे. त्यात चोर ही कसे सुटतिल त्यामुळे ह्या चोराने चोरलेल्या वस्तूने चोर हा हेल्थ कॅान्शियस असल्याचे समजले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बायोगॅसची टाकी स्वच्छ करताना ३ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू, पुरंदरातील धक्कादायक घटना

Weight Loss Recipe : महिन्याभरात वजन कमी करायचंय? प्रोटीनने भरलेले 'हे' सँडविच नाश्त्याला खा

महिलांचे फोटो, केस, अगरबत्ती, अन् काळ्या बाहुल्या...; मध्यरात्री यवतमाळात भयंकर कांड

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये बायोगॅसची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

Face Care: उन्हाळ्यातही तुमचा चेहरा करेल नॅचरल ग्लो; फक्त 'या' फळांचा तुमच्या आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT