नाशिक: अशी होतेय ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी... Saam Tv
महाराष्ट्र

नाशिक: अशी होतेय ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी...

हे साहित्य संमेलन केवळ साहित्य संमेलन न राहता तो नाशिकचा उत्सव व्हावा, यासाठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला आता वेग आलाय. येत्या 3, 4 आणि 5 डिसेंबरला नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीत हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. हे साहित्य संमेलन केवळ साहित्य संमेलन न राहता तो नाशिकचा उत्सव व्हावा, यासाठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

हे साहित्य संमेलन भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रशस्त मैदानावर होणार असून एका वेळी ८ ते १० हजार साहित्य प्रेमी बसू शकतील इतका भव्य आणि प्रशस्त सभामंडप उभारण्यात येणार आहे. संमेलनस्थळी बालकवी संमेलन, कवी कट्टा, गझल आणि भव्य पुस्तक प्रदर्शन अशी वेगवेगळी व्यवस्था भुजबळ नॉलेज सिटीच्या कॅम्पसमध्ये असणार आहे. तर साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक शहराचं सुशोभीकरण, चौकाचौकात तसंच गंगाघाटावर आकर्षक सजावट, रांगोळ्या, लाईटिंग, संमेलनाचे होर्डिंग्ज लावण्याचं नियोजन करण्यात येतंय.

विशेष म्हणजे साहित्य संमेलन दर्जेदार व्हावं, जास्तीत जास्त साहित्य प्रेमी आणि नागरिकांना साहित्य संमेलनात सहभागी होता यावं, यासाठी नाशिक शहरातील १४ ठिकाणांहून संमेलन स्थळी येण्या-जाण्यासाठी दर १५ मिनिटाला महापालिकेची शटल बससेवा ठेवण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संमेलन स्थळी येणाऱ्या साहित्य रसिकांना मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

SCROLL FOR NEXT