Parali : वयोवृद्ध नागरिकाच्या अंगावरती पावडर टाकून चोरट्यांनी पळवली दोन लाखांची बॅग Saam TV
महाराष्ट्र

Parali : वयोवृद्ध नागरिकाच्या अंगावरती पावडर टाकून चोरट्यांनी पळवली दोन लाखांची बॅग

परळीमध्ये एका वयोवृद्ध नाररिकांच्या अंगावरती अंगाला खुजली होणारी पावडर टाकून त्याच्या जवळची पैशांची बॅग चोरी केल्याचा धक्कादायक घटना समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परळी : परळीमध्ये एका वयोवृद्ध नाररिकांच्या अंगावरती अंगाला खुजली होणारी पावडर टाकून त्यांच्या जवळची पैशांची बॅग चोरी केल्याचा धक्कादायक घटना समोर आला आहे. परळतील एका नामांकित बँकेच्या परिसरात ही घटना घडली आहे. खाज सुटणारी पावडर (Powder) टाकून दोन लाखांची बॅग पळवल्याचा प्रकार सोमवारी घडला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

बॅग चोरीला गल्याची फिर्याद परळीतील सेवानिवृत्त प्रभाकर बाळाजी शिंदे ( वय 66 ) यांनी दिली आहे. शिंदे हे एका नामांकित सहकारी बॅंकेच्या (Bank) परिसरामध्ये 3 जानेवारीला दुपारी साडेचारच्या सुमारास गेले होते त्यावेळी त्यांच्याकडे एक बॅग होती ज्यामध्ये रोख रक्कम 2लाख 10 हजार रुपये आणि बॅकेचे पासबुक (Bank Passbook) यावेळी तीन अनोळखी लोक त्यांच्या बाजूला आले आणि अचानक त्यांच्या अंगावरती पावडर पडल्याचे लक्षात आले पावडर पडताच शिंदे यांच्या अंगाची आगआग सुरु झाली.

हे देखील पहा -

त्यांनी अंग खाजवण्यासाठी त्यांच्या जवळची बॅग तिथल्या खुर्चीवरती ठेवली मात्र काही क्षणातच ही बॅग चोरीला गेल्याचे त्यांना समजले मात्र तोपर्यंत गुन्हेगारांनी तिथून पळ काढला. दरम्यान याप्रकरणी प्रभाकर बाळाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन आरोपींविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात (Parli city police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

MSRTC: रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग...; गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी, ST कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

SCROLL FOR NEXT