महिलेच्या हातातली २ लाख रक्कम असणारी बॅग चोरट्यांनी लांबवली! सागर गायकवाड
महाराष्ट्र

Crime : महिलेच्या हातातली २ लाख रक्कम असणारी बॅग चोरट्यांनी लांबवली!

पैसे काढून घराच्या दिशेने जाणाऱ्या महिलेच्या हातातून रोख रक्कम दोन लाख रुपये ठेवलेली बॅग हिसकावून नेली आहे. या चोरीच्या घटने प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- सागर गायकवाड

नाशिक : दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी नाशिक शहरातील शालिमार येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखेतून पैसे काढून घराच्या दिशेने जाणाऱ्या महिलेच्या हातातून रोख रक्कम दोन लाख रुपये ठेवलेली बॅग हिसकावून नेली आहे. या चोरीच्या घटने प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नाशिक शहरातील शिवाजी रोड शालिमार या भागात राहणारे रेहेना रफिक शेख आणि त्यांचे पती रफिक सुलेमान शेख यांनी आपल्या मुलाला वाहन घेऊन देण्यासाठी आणि घर खर्चासाठी शालिमार नेहरू गार्डन जवळील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून 2 लाखांची रक्कम काढली होती.

हे देखील पहा :

दुपारी 1 ते दीड वाजेच्या दरम्यान ते ही रक्कम काढून घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या दोघा चोरट्यांनी मागून दुचाकीवरून येऊन रेहेना शेख यांच्या हातातून रोख रक्कम 2 लाख ठेवलेली बॅग हिसकावून नेत शालिमार च्या दिशेने पोबारा केला. रेहेना शेख व पती यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र, हे चोरटे दुचाकीवर असल्याने त्यांना पकडणं शक्य झाले नसल्याचे घटनेतील पीडितांनाकडून सांगण्यात आले आहे. हे दोन्ही चोरटे जवळच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.

तर, नाशिक शहर पोलिस या सीसीटीव्ही च्या आधारे चोरत्याचा शोध घेत आहेत. दिवसेंदिवस शहरात चोरी, मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होऊन, चोरट्यांचा मनात पोलिसांचा धाक राहायला नाही की काय असाच प्रश्न कालच्या भर वस्तीत झालेल्या चोरीच्या घटनेकडे बघितल्यावर येत आहे. त्यामुळे हेल्मेट सक्ती सोबतच शहरात घडणाऱ्या चोरी, चैन स्नॅचिंग यांसह आदी गुन्ह्यांना आळा कसा बसेल याकडे देखील लक्ष देणे गरजेचे झाले आहे. तेव्हा पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी अश्या वाढत्या घटनाना आळा बसण्यासाठी वेळीच योग्य ती पाऊले उचलावी व धार्मिक महत्व असलेल्या मंदिरांच्या शहराची ओळख ही वाढत्या गुन्हेगारच शहर म्हणून नको व्हायला एवढीच अपेक्षा सर्वसामान्य करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT