Barshi crime news Saam Tv
महाराष्ट्र

पती-पत्नी रस्त्यावरून जात होते, पाठीमागून दुचाकी आली अन् काही क्षणांत...

बार्शी-सोलापूर रस्त्यावर धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

बार्शी : बार्शी-सोलापूर रस्त्यावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या रस्त्यावर असलेला रेल्वेपूल ओलांडल्यावर प्रवाशांना धारधार शस्त्राचा धाक दाखवून चोरटे लाखोंचा ऐवज लंपास करत आहेत. रस्त्यावरुन जाणाऱ्या एका दाम्पत्याला (Robbery Crime) चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून सोन्यासे दागिने आणि पाच हजार रुपये असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लुटल्याची घटना घडलीय. पत्नी-पत्नी रस्त्यावरुन दुचाकीने जात असताना चोरट्यांनी त्यांना मागून धडक दिली आणि चोरीची संधी साधली. याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी (Barshi Police) चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी-सोलापूर रस्त्यावर रेल्वेपूल ओलांडताच दुचाकीस्वारांनी मागून धडक देऊन दुचाकीवरुन जाणाऱ्या पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बार्शी येथील भांडेगाव येथे राहणारे कल्याण जाध(57) यांनी फिर्याद दाखल केलीय. ही घटना १६ऑगस्टला रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली.

बार्शी येथील माऊली मंगल कार्यालयात कल्याण जाधव पत्नी उषा यांच्यासह एक कार्यक्रम आटोपून घरी जात असताना लक्ष्मी मंदिराजवळ पाठीमागून दोन दुचाकीवरुन चार तरुण आले. त्यानंतर त्यांनी दाम्पत्याला खाली पाडले.एका तरुणाने चाकूचा धाक दाखवून पत्नीच्या अंगावर असलेले एक तोळा सोन्याचे गंठण, एक तोळ्याचे कानातील फुले,एक तोळ्याची बोरमाळ,अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र,पाच हजार रुपये रोख असा ऐवज बळजबरीने काढून घेतला.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT