Vasai-Virar Crime News Saam TV
महाराष्ट्र

वाहनाच्या चाकाच्या रंगावरून अट्टल चोरट्यांचा पोलिसांनी लावला छडा!

वसई वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोबाईल मनोर्यातील एबी कार्ड चोरी गेल्याची तक्रार १६ मार्च रोजी दाखल करण्यात आली होती.

चेतन इंगळे

वसई/विरार: मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वालीव गुन्हे पोलीस प्रकटीकरण शाखेने मोबाईल मनोऱ्यात ४ जी आणि ५ जी नेटवर्कसाठी वापरले जाणारे एबी, बीटीएस व वीआयएलचे कार्ड चोरणारी टोळी अटक केली आहे. यात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. केवळ मोटारसायकलच्या चाकाला लावलेल्या मॅकव्हीलच्या रंगावरून पोलिसांनी या टोळीला बेड्या ठोकल्या. या टोळीवर पाच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

वसई वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मोबाईल मनोर्यातील एबी कार्ड चोरी गेल्याची तक्रार १६ मार्च रोजी दाखल करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चोरी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करण्यात सुरवात केली. यावेळी पोलिसांना एक मोटारसायकल वर दोन आरोपी संशयित मिळाले. या मोटारसायकलच्या क्रमांकावरून पोलिसांनी शोध सुरु केला.

पण आरोपींनी मोटारसायकल वरील क्रमांक बोगस असल्याने पोलिसांचा संशय बळकावला होता. पण आता या चोरांना शोधणार कसे असा प्रश्न निर्माण झाला असताना पोलिसांनी कॅमेऱ्याच्या चित्रफित पुन्हा तपासल्या असता या मोटार सायकलच्या चाकांना लाल रंगांचे मॅकव्हील लावलेले दिसले. अशा पद्धतीच्या मोटार सायकल कमी असल्याने पोलिसांना नवी दिशा मिळाली. संशयितांच्या मोटार सायकल ज्या ज्या परिसरातून गेली त्या परिसरात या मोटार सायकल विषयी माहिती घेतली असता आरोपी रामजनम यादव याला वसई पूर्व येथून ताब्यात घेतले.

पोलिसांनी कसून तपासणी केली असता त्यांनी गुन्हाची आणि इतर साथीदारांची नावे पोलिसांना दिली. माहितीच्या आधारे पोलिसांनी अर्जुन यादव वसई, अनिस मलिक मुंबई, रामसुरत वर्मा मुंबई यांना सापळा रचून अटक केली आहे. पोलिसांनी माहिती दिली की, या आरोपींनी वालीव, पेल्हार, डहाणू, सफाळे, मनोर या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

SCROLL FOR NEXT