tomato, gondia news, gondia crime news saam tv
महाराष्ट्र

Tomato Price Hike : टाेमॅटाे भाव खाऊ लागताच 400 किलाेंवर चाेरट्यांनी मारला हात; पाेलिस तपास सुरु

Gondia Crime News : पाेलिस टाेमॅटाे चाेरांचा शाेध घेताहेत.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Gondia News : सध्या सर्वत्र भाजी बाजारातील दरपत्रक बघितल्यास भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातत टोमॅटो सर्वाधिक भाव (Tomato Price Hike) खाऊन जात आहे हे दिसून येत आहे. टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याचे लक्षात येताच चाेरट्यांची त्याच्यावर नजर पडली. गाेंदियातून तब्बल 400 किलाे टाेमॅटाे चाेरीस गेल्याची घटना घडली आहे. (Maharashtra News)

गोंदिया भाजी बाजारात गुरुवारी टोमॅटो १०० रुपये ते १२० रुपये विक्री केला गेला. अश्याच एका दुकानात किरकाेळ विक्री करिता खरेदी करून ठेवलेला २० केरेट टोमॅटो (tomato) आणि इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा चोरांनी भाजी बाजारातील दुकानातून चोरून नेल्याची घटना गोंदिया भाजी बाजारात घडली.

सर्वत्र भाजी बाजारात या घटनेची चर्चा इतर भाजी विक्रेते करीत होते. या संदर्भात फिर्यादी बबन उर्फ (बब्बु) गंगभोज यांनी टोमॅटो चोरीची घटनेची तक्रार गोंदिया (gondia) शहर पोलिस ठाण्यात दिली. पाेलिस टाेमॅटाे चाेरांचा शाेध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Maharashtra Live News Update: - सोलापूर जिल्ह्यात माढा येथे सर्वाधिक पुरस्थिती

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Pune Crime News : दिवसा खासगी बँकेत नोकरी, रात्री करायचा भयंकर खेळ; पुण्यातील तरुणासह ३९ जण अडकले

SCROLL FOR NEXT