Crime News , Sangli , Police Saam TV
महाराष्ट्र

Crime News : काय सांगता ! पाेलिसांचे फ्लॅट फाेडले; दागिन्यांसह राेख रक्कमही पळवली

या घटनेमुळे पाेलिसांची दाेन्ही कुटुंबांना आर्थिक फटका बसला आहे.

विजय पाटील

सांगली : नागरिकांच्या घरांचे रक्षण करणा-या पाेलिसांच्या (police) फ्लॅटमध्ये चाेरीची (theft) घटना घडल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चाेरट्यांनी पाेलिसांच्या दोन फ्लॅटमध्ये चाेरी करुन सुमारे आठ तोळे सोने (gold) आणि तीन हजार रुपये रोख असा एकूण सुमारे साडे चार लाखांचा मुद्देमाल चाेरला आहे. (Sangli Crime News)

ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कुपवाड रस्त्यावरील कृष्णकुंज अपार्टमेंटमध्ये घडली. या दोन्ही चोरीची नाेंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे संदीप मोरे आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पूजा खाडे यांचे फ्लॅटमध्ये चोरी झाली.

मोरे हे ड्युटीवर पोलीस ठाण्यात असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घरावर पाळत ठेऊन मोरे यांचा पहिल्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सहा तोळे सोने आणि तीन हजार रोख रुपये चोरले. त्यानंतर त्याच इमारतीत तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या पूजा खाडे यांच्या घराचे लॉक तोडत घरातील दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

SCROLL FOR NEXT