Sangli Crime News Saam Tv
महाराष्ट्र

खोजनवाडीत घरफाेडी; सोन्याच्या दागिन्यांसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास

जत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यातील (jat taluka) खोजनवाडी (khojanwadi) येथे जबरी चोरी झाली आहे. घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत चिदानंद सिदाप्पा संती यांनी जत पोलिस ठाण्यात (jat police station) तक्रार नाेंदवली आहे. (sangli latest marathi news)

संती यांनी दिलेल्या तक्रारीनूसार शनिवारी त्यांचे यांचे कुटुंबीय रात्री जेवण करून झोपी गेले हाेते. पहाटे उठल्यानंतर त्यांना घरात चाेरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी त्यांची घर फोडून कपाटातील साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र, चार तोळ्यांचे गंठण, पाच ग्रॅमची अंगठी, नेकलेस, दोन तोळ्यांची कर्णफुले, एक तोळ्याचे सोन्याचे २० मणी व दोन लाख दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

या चोरीची माहिती त्यांनी जत पोलिसांना (jat police) दिली. पाेलीसांनी (police) घटनास्थळाचा पंचनामा केला. जत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav 2026 : गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्र भक्तिमय, मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

Maharashtra News Live Update: सांगलीमध्ये भीषण अपघात, कार वारणा नदीत कोसळली

konkan Fort : घोड्याच्या नालासारखा आकार असलेला किल्ला, रचना पाहून व्हाल थक्क!

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

SCROLL FOR NEXT