beed , crime news saam tv
महाराष्ट्र

Beed : बेलेश्वर मंदिराचा दरवाजा उघडताच पुजा-यास बसला धक्का

बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद जिरे

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या बेलेश्वर मंदिरात (temple) चोरी (theft) झाली आहे. यावेळी पंचधातुच्या मुकुटसह चांदीची पिंडीवरील शेषनागाची मुर्तीवर चोरट्यांनी मारला डल्ला मारला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Beed Crime News)

बेलेश्वर संस्थानचे तुकाराम महाराज भारती नित्यनेमाने पुजेसाठी मंदिरात गेले असता गाभाऱ्याचे कुलुप तुटलेले व मंदिराचे दार सताड उघडे असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांना धक्का बसला. त्याठिकाणी निरीक्षण केल्यानंतर महादेवाच्या पिंडीवरील पंचधातुचा मुकुट व पिंडीवर मांडण्याची चांदीची शेषनागाची मुर्ती चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यापुर्वी याच मंदिरात दानपेट्यांची चोरी झाली हाेती. आता पुन्हा मंदिरात चाेरीचा प्रकार घडला आहे. यावेळी मात्र गाभाऱ्यात चोरी झाली आहे. गाभा-यातील चाेरीचा प्रकार हा पहिलाच आहे असे महंत महादेव भारती महाराज यांनी नमूद केले. दरम्यान याप्रकरणी बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Liver health: लिव्हर कधीच होणार नाही खराब; डॉक्टरांनी सांगितलेले हे 2 ज्यूस सकाळी प्या, लगेच दिसेल फरक

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर ₹१,००० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ED कडे तक्रार दाखल

Morning Meditation Benefits: सकाळी 5 मिनिटे ध्यान केल्याने शरीर आणि मनावर काय परिणाम होतो?

Shocking : भीषण अग्नितांडव! दोन शाळा जळून खाक, २९ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT