Akola News जयेश गावंडे
महाराष्ट्र

धक्कादायक! पुलावर दुचाकी उभी करत तरुणाने घेतली नदीत उडी; शोध सुरु

सदर तरुण पुर्णा नदीच्या परीसरात कुठे आढळून आल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोला (Akola) येथील गांधीग्राम येथील पुर्णा नदीत एका तरुणाने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली असून या विद्यार्थ्याचा शोध आपत्कालीन पथकाकडून सुरु आहे. नदी (River) पात्रात उडी मारलेल्या तरुणाचे नाव अक्षय गजानन ताथोड असे आहे. तो अकोल्यातील विश्वकर्मा नगर मोठी उमरी येथे राहतो.

नदीच उडी घेताना अक्षयने आपल्या दुचाकीसह इतर साहित्य पुलावर ठेवले आणि काही कळायच्या आत त्याने उडी मारली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच दहीहंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच अक्षयला शोधण्यासाठी पिंजर येथील संत गाडगे बाबा आपात्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले होते.

पाहा व्हिडीओ -

मात्र, रात्रीची वेळ असल्याने शोध कार्यात अडथळा निर्माण होत असल्याची माहिती मिळाली आहे. नदीपात्रात उडी घेणारा तरुण खाजगी इलेक्ट्रिशीयन असुन तो होतकरु व मेहनती असून त्याला दोन बहिणी असल्याची माहिती मिळाली आहे. शिवाय सदर तरुण पुर्णा नदीच्या परीसरात कुठे आढळून आल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT