वीज निर्मितीतून येलदरी धरणाने कमावले दहा कोटी रुपये राजेश काटकर
महाराष्ट्र

वीज निर्मितीतून येलदरी धरणाने कमावले दहा कोटी रुपये

दिनांक 7 ऑक्टोबर रोजी येलदरी धरण विद्युत केंद्राच्या 53 वर्षाच्या इतिहासातील सर्वोच्च वीज निर्मिती करण्यात आली. तब्बल 5 लाख 52 हजारावर युनिट वीज निर्मिती करून एक नवा उच्चांक प्रस्तापित केला आहे.

राजेश काटकर

परभणी : संपूर्ण देशात सध्या मोठे वीज संकट उभारलेले असतांना परभणी जिल्ह्यातील येलदरी जल विद्युत केंद्राने यावर्षीच्या पावसाळ्यात येलदरी धरण 100 टक्के भरल्यानंतर 7 सप्टेंबर 2021 पासून आजपर्यंत तब्बल 3 कोटी 8 लाख 69 हजार युनिट एवढी प्रचंड वीज निर्मिती पुराच्या अतिरिक्त पाण्यापासून करून एक मोठा विक्रम केला आहे.

हे देखील पहा :

या विजेमुळे महानिर्मिती कंपनीने देखील आपल्या तिजोरीत तब्बल 9 कोटी 56 लाख 93 हजार नऊशे रुपयांची कमाई केली आहे. तसेच ऐन अडचणीच्या काळात महावितरण कंपनी ला देखील वीज तुडवड्यापासून बचाव करण्यासाठी काही अशी साथ दिली आहे.

तसेच या केंद्राने या पावसाळ्यात धरणात अधिक पाणी साठा राहिल्याने येलदरी जल विद्युत केंद्राचा दैनिक वीज निर्मितीचा उच्चांक देखील केला. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी विद्युत केंद्राच्या 53 वर्षाच्या इतिहासातील सर्वोच्च वीज निर्मिती करण्यात आली. तब्बल 5 लाख 52 हजार युनिट वीज निर्मिती करून एक नवा उच्यांक प्रस्तापित केला आहे.

Edited By : Krushnarav sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT