शिवसेनेचा दणका! आंदोलनाला यश, आक्षी रस्त्याचे रखडलेले काम होणार सुरू Saam TV
महाराष्ट्र

शिवसेनेचा दणका! आंदोलनाला यश, आक्षी रस्त्याचे रखडलेले काम होणार सुरू

आक्षी ग्रामपंचायत हद्दीत आक्षी स्तंभ ते साई मंदिर हा दोन किलोमीटर रस्ता गेली पाच सहा वर्ष नादुरुस्त आहे.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: अलिबाग तालुक्यातील आक्षी गावातील खड्डेमय रस्त्यासाठी आज शिवसेनेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन केले. शिवसेनेच्या या आक्रमक आंदोलनाला शेकापची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य ग्रामस्थांसामोर येण्यास धजावले नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. शिवसेनेच्या दणक्याने अखेर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आक्षी विभागप्रमुख शंकर गुरव याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आमदार महेंद्र दळवी यांनीही या रस्त्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित काम सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत.

आक्षी ग्रामपंचायत हद्दीत आक्षी स्तंभ ते साई मंदिर हा दोन किलोमीटर रस्ता गेली पाच सहा वर्ष नादुरुस्त आहे. या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असल्याने आक्षी ग्रामस्थांना खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या रस्त्यासाठी आक्षी ग्रामस्थ यांनी अनेकवेळा आंदोलन निवेदन दिले मात्र याकडे प्रशासनाने कानाडोळा केला. अखेर शंकर गुरव यांनी 10 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायती समोर ग्रामस्थांच्या उपस्थिती तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्यानुसार आज शिवसेनेच्या माध्यमातून आक्षी ग्रामपंचयतीसमोर ग्रामस्थांनी आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी पक्षातील एकाही सदस्याने आंदोलन कर्त्यांना भेटण्याचे औदार्य दाखविले नाही.

आक्षी स्तंभ ते साई मंदिर रस्त्यासाठी 23 लाख निधी मंजूर झाला असून अद्यापही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थ यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अखेर लवकरच रस्त्याचे काम सुरू करण्याचे अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शंकर गुरव, समीर म्हात्रे, शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आंदोलनात मोठ्या संख्येने सामील झाले होते. शिवसेनेच्या आंदोलनानंतर रस्त्याचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आक्षीकरांचा प्रवास सुखकारक होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT