Nagpur News  Saam TV
महाराष्ट्र

बलात्कार करायचाच असेल वारांगणांवर करा, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं वक्तव्य

पोलिसांनी नागपुरातील (Nagpur) गंगा जमुना या रेड लाईट एरियावर कारवाई केली होती.

संजय डाफ

नागपूर: बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा, मात्र, सुसंस्कृत घरातील महिलांवर बलात्कार करू नका, असं वक्तव्य राष्ट्रवादी महिला अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी केलं आहे. नागपूर पोलीस आयुक्तांनी वारांगणांवर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज जागतिक महिला दिनी (Women's Day 2022) काळा दिवस पाळून आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

पोलिसांनी नागपुरातील (Nagpur) गंगा जमुना या रेड लाईट एरियावर कारवाई केली होती. तसेच हा परिसर सील करण्यात आला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे या आक्रमक झाल्या आहेत. पोलीस आयुक्तांनी एका ६० वर्षीय महिलेवर तडीपारीची कारवाई केली. त्याचा निषेध करण्यासाठी वारांगणांसह ज्वाला धोटे यांनी मानवी साखळी करत आंदोलन केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.

''माझ्या समस्त माता-बहिणी वारांगणा लोकांना आवाहन करतात की, बलात्कार करायचा असेल, स्वतःच्या शरीराची भूक भागवायची असेल तर आमच्याकडे या. परंतु, सुसंस्कृत घरातील महिलांवर, मुलींवर वाईट नजर टाकू नका. नराधमांची भूक भागवण्यासाठी आम्ही आहोत. पण, सुसंस्कृत घरातील महिलांकडे वाईट नजरेनं पाहू नका'', असं आवाहन माझ्या वारांगण महिला करत आहेत, असं ज्वाला धोटे यावेळी म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आताची सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी संधी; भाजपच्या 'या' सर्वात ताकदवर समितीत होणार एन्ट्री?

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

FD Break Rules: FD तोडण्याचा विचार करताय? आधी जाणून घ्या बँक किती पेनल्टी कापते आणि नुकसान कसे टाळाल

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

SCROLL FOR NEXT