Winter Session 2021: हिवाळी अधिवेशन, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात...(पहा व्हिडिओ)  Saam Tv
महाराष्ट्र

Winter Session 2021: हिवाळी अधिवेशन, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात...(पहा व्हिडिओ)

आता हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये होणार असून डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हे अधिवेशन होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हिवाळी अधिवेशनाची Winter Assembly session २०२१ तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात होते. तसेच अधिवेशन मुंबईमध्ये घेण्याची मागणी होती. मात्र, आता हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये Nagpur होणार असून डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये हे अधिवेशन होणार आहे.

विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. विधीमंडळ कामकाज समिती बैठकीमध्ये प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. यानंतर अधिवेशन नागपुरमध्ये घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जानेवारी महिन्याच्यानंतर मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे अशा मोठ्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात गाजत आहे.

पहा व्हिडिओ-

तसेच राज्यात गांजा, ड्रग्स या मुद्द्यावरून देखील विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या अधिवेशनामध्ये आणखी कोणते मुद्दे उपस्थित केले जात आहेत हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. विधान परीषदेच्या निवडणुका येत्या १० डिसेंबर दिवशी होत आहेत. यामुळे सर्व पक्षांनी हिवाळी अधिवेशन १ आठवडा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यामुळे हिवाळी अधिवेशन जानेवारीमध्ये होण्याची शक्यता होती. मात्र, आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे अधिवेशन होणार आहे. पण, हे अधिवेशन किती दिवसाचे होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. पण, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ख्रिसमसची सुट्टी देखील आली आहे. यामुळे अधिवेशन ५ दिवसाचे होणार की ८ दिवसाचे होणार? याबाबत अजून देखील शंका आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT