कुटुंबावर सशस्त्र हल्ला करणाऱ्यावर कारवाईसाठी कुटुंबाचा उपोषणाचा इशारा. Google
महाराष्ट्र

कुटुंबावर सशस्त्र हल्ला करणाऱ्यावर कारवाईसाठी कुटुंबाचा उपोषणाचा इशारा

जुन्या वादातून एका कुटुंबावर दहा ते बारा जणांनी सशस्त्र हल्ला चढवल्याने यामध्ये महिला, मुली व पुरुष देखील गंभीर रित्या जखमी झाले होते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव

बुलढाणा : जुन्या वादातून एका कुटुंबावर दहा ते बारा जणांनी सशस्त्र हल्ला चढवल्याने यामध्ये महिला, मुली व पुरुष देखील गंभीर रित्या जखमी झाले होते. त्यावरून तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेच्या सांगण्यावरून पोलिसांनी तक्रार नोंदवली नसल्याचे आरोप फिर्यादी महिलेने केला आहे. तर गेल्या पंधरा दिवसांपासून आरोपींवर कुठलीच कारवाई झाली नसल्याने या आरोपींवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी व न्याय देण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर न्याय न मिळाल्यास कुटुंबासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा पिडीत कुटुंबातील जखमी तरुण महादेव इंगळे याने दिला आहे.

तामगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भोन नवीन या गावातील महादेव इंगळे त्यांच्या कुटुंबीयांवर दहा ते बारा लोकांनी लोखंडी रॉड घेऊन अचानकपणे रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास हल्ला चढवला, ज्यामध्ये पाच जण जखमी झाले असून यामध्ये महिला व मुलींचा देखील समावेश आहे. या घटनेवरून फिर्यादी महिलेने तामगाव पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार स्थानिक पोलिसांनी महिलेने सांगितल्याप्रमाणे तक्रार घेतली नसल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तर गेल्या पंधरा दिवसांपासून हे सर्व आरोपी मोकाट असून त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याने या महिलांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करत न्याय मागितला आहे. त्या सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा कुटुंबासह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा फिर्यादी महिलेने दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी मोठा खुलासा; 34 बोगस शिक्षक, प्रत्येकी ४,५०,००० ची ‘सेटिंग’

सुप्रीम कोर्टानं गोहत्या बंदीचा निर्णय बदलला; सरकारकडून नोटीस जारी

Maharashtra News Live Update: पेरलेले सोयाबीन न उगवल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांची एसडीओ कार्यालयावर धडक

Nashik Fort : ४,८२९ फूट उंचीवर वसलेले नाशिकमधील ऐतिहासिक ठिकाण, किल्ल्यावरून दिसणारे विहंगम दृश्य मन जिंकून घेईल

Badlapur Tourism: हिरव्यागार टेकडीवर वसलंय शिवकालीन जागृत खंडोबा मंदिर; भाविकांसाठी श्रद्धेचं अनोखं स्थान

SCROLL FOR NEXT