Chandrapur Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Chandrapur : तब्बल नऊ बकऱ्या फस्त करणाऱ्या 'त्या' 12 फुटी अजगराची दहशत संपवली

चंद्रपूर जिल्ह्यात अर्थ कंझरवेशन ऑर्गनायझेशनला मोठे यश आले आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर - जिल्ह्यातील ब्रम्हपुरी (Bhramapuri) तालुक्यातल्या उचली गावात गेल्या 1 वर्षापासून अजगराची दहशत निर्माण झाली होती. अखेर या अजगराला (Sanke) पकडण्यात यश आले आहे. या अजराने तब्बल 9 बकऱ्या फस्त केल्याची माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली आहे. ग्रामस्थांना गावालगत शेतशिवरात एक महाकाय अजगर सतत दिसायचा. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून अजगरामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण होते. (Chandrapur Latest News)

या अजगराने एक-एक करत गावातील तब्बल 9 बकऱ्या फस्त केल्या आहेत. अजगराचा वावर असल्याने गावकरी शेतात जायला घाबरायचे, तसेच लहान मुलांना लगतच्या भागात जाण्यास प्रतिबंध करण्यात आले होते. दरम्यान शेतकरी ढोंगे यांची चौथी बकरी अजगराने मारली. ही माहिती अर्थ कंजरवेशन ऑर्गायझेशन संस्था सदस्यांना देण्यात आली.

सर्पतज्ञ ललित उरकुडे, विवेक राखडे, चेतन राखडे व ईशान वठे यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी मोठ्या शिताफीने अजगराला पकडले. महाकाय अजगर जेरबंद झालेला बघून गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला व संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. हा अजगर एकूण १२ फूट लांबीचा होता. या आकाराचा अजगर ब्रम्हपुरी भागात आढळल्याची ही पहिलीच नोंद आहे. या अजगरला जंगलात सुरक्षित सोडण्यात आले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज खा हे पदार्थ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

Black Neck Removal Tips: मानेवरचा काळेपणा कसा घालवायचा? या 3 सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

Drinking Warm Water: खरंय का? गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो का? तज्ज्ञांनी सांगितले, शरीरात काय बदल होतात?

SCROLL FOR NEXT