Beed News विनोद जिरे
महाराष्ट्र

परळीत व्यापाऱ्याची आत्महत्या; 16 सावकारांवर गुन्हा दाखल...

ही आत्महत्या सावकाराच्या जाचास कंटाळून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

विनोद जिरे

बीड - परळी (Parali) शहरातील अरुणोदय मार्केटमधील व्यापारी प्रवीण मालेवार यांनी स्वतःच्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, दोन दिवसांपूर्वी 18 तारखेला उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. तर ही आत्महत्या सावकाराच्या जाचास कंटाळून केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Beed Crime News)

हे देखील पहा -

मयत प्रवीण मालेवर यांच्या पत्नी मेघा मालेवार यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की, 2013 साली प्रवीण यांनी २५ लाखांना घर खरेदी केले होते. यावेळी त्यांच्यावर खूप सारे कर्ज झाले होते. 2018 साली घर विकूनही पूर्ण कर्ज फिटले नाही. मुद्दल आणि व्याजासह पैसे देऊनही सावकारांनी अधिक रकमेसाठी त्यांच्याकडे तगादा लावल्याने ते तणावात होते.

गोपाळ मुंडे, सुभाष मुंडे, पारसेवार, मधुकर साखरे, विष्णु मुंडे, मयुर हरगावकर, शामराव कातकडे, प्रकाश चिद्रवार, संजय मुळे, अघाव मॅडम, अग्रवाल ग्लास, कृष्णा भांगे, बालाजी मुंडे, बाबर भाई, शिव ओपळे आणि बोकन सोनार यांचे कर्ज फेडूनही ते त्रास देत असल्याबद्दल प्रवीण यांनी हिशोबाची चिट्ठी लिहून गुरुवारी रात्री सांगितले होते.

मला खूप वैताग आला आहे, हे लोक मला सोडणार नाहीत, असेही प्रवीण म्हणाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडून प्रवीण यांनी दुकानात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. या दिलेल्या फिर्यादीवरून, परळी शहर ठाण्यात सर्व 16 सावकारांवर प्रवीण मालेवार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान यामुळं अव्वाच्या सव्वा व्याज घेणाऱ्या सावकारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

SCROLL FOR NEXT