MSRTC saam tv
महाराष्ट्र

MSRTC: एसटी महामंडळाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्याची महत्वाची बैठक; पगाराबाबत घेतला मोठा निर्णय..

आज एसटी महामंडळाच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai: महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा पगार या महिन्याची 14 तारीख आली तरी झालेला नाही, त्यामुळे कर्मचारी नाराज झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार एवढी वर्षे सात ते दहा तारखे दरम्यान होत आला आहे. परंतू कोरोना काळानंतर वेळेवर पगार मिळणे बंद झाले. याचसंबंधी आज सरकारसोबत महत्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये एसटी कामगारांचा पगार ७ तारखेला होणार असल्याचे जाहीर केले आहे. (MSRTC)

आज एसटी महामंडळाच्या प्रश्नांबाबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळतं ते मिळावं अशी मागणी केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) अधिकाऱ्यांना याबाबत माहिती घेण्यासाठी सांगितलं आहे. याबद्दलची माहिती गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये शिस्तीबाबत ज्या जाचक अटी आहेत त्या रद्द करण्याबाबत निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे पगाराबाबत देखील निर्णय झाला आहे. जर महिन्याच्या 5 तारखेला जी तूट असते ती शासनाकडून देण्यात येईल त्यामुळे 7 तारखेला पगार कर्मचाऱ्यांचे पगार होतील, असे घोषित करण्यात आले आहे.

त्याचबरोबर या बैठकीत 38 हजार ईटीआय मशिन देण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. चांगल्या प्रतिचे कापड देण्याबाबत देखील निर्णय झाला आहे.तसेच ज्यांनी एकाच जागेवर 3 वर्ष पूर्ण केली आहेत त्यांच्या बदल्यांबाबत लवकरच निर्णय घेऊ असे ही आश्वासन देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Post Offer: शंभर आमदार आणा अन् मुख्यमंत्री व्हा! दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सीएम पदाची ऑफर

Maharashtra Live News Update: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मृत महिलेचा आढळला

Viral Video: इच्छा असेल तर...; विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेवर चिकटवली २०० रुपयांची नोट, लिहिलेली शायरी वाचून पोट धरून हसाल

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

SCROLL FOR NEXT