Buldhana: माकनेर मंदिराच्या पुजाऱ्याला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद संजय जाधव
महाराष्ट्र

Buldhana: माकनेर मंदिराच्या पुजाऱ्याला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील माकनेर या गावातील मंदिरातील पुजारी श्रीकृष्ण धोरण यांना गावातील गुंडा कडून विनाकारण मारहाण करण्यात आली

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील माकनेर या गावातील मंदिरातील पुजारी श्रीकृष्ण धोरण यांना गावातील गुंडा कडून विनाकारण मारहाण करण्यात आल्याने परिसरातील ८ ते १० गावातील शेकडो नागरिकानी पोलीस स्टेशनला या गुंडावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला ठिय्या दिला आहे. पुजाऱ्याला मारहाण करत असतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

हे देखील पहा-

माकनेर या गावातील पुजारी श्रीकृष्ण धोरण आणि त्यांच्या पत्नीस झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करत माकनेरसह परिसरातील धानोरा, घीर्णी, भाडगणी, मोरखेड, मलकापूर, खामगाव, ढोरपगाव, काटी अशा १० गावातील नागरिकांच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. माकनेर येथील पुजारी श्रीकृष्ण धोरण आणि त्यांच्या पत्नी सौ सुधा धोरण यांनी सकाळी गावातील घनशाम ढोले यांना मंदिरासमोर सोयाबीन वाळत घातल्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यास अडथळा येत होता.

तसेच कोजागिरी पौर्णिमा असल्याने भाविकांची ये- जा असल्याने मंदिरासमोर अडथळा करू नका असे म्हटल्याने गावातील गुंड प्रवृत्तीचे घनशाम ढोले त्याचे वडील राजेंद्र ढोले यांनी पुजारी श्रीकृष्ण धोरण आणि त्यांची पत्नी सौ सुधा धोरण यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि मारहाण केली होती. सदर घटनेचा सुधा धोरण यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.

पुजारी श्रीकृष्ण धोरण आणि त्यांची पत्नी सुधा धोरण यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी परिसरातील गावामधून मोठ्या संख्येने नागरिकांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत सदर घटनेचा निषेध व्यक्त करत ५०० ते ६०० नागरिकांच्या सह्यांचे निवेदन ठाणेदार यांना दिले आहे. तसेच आरोपी घनशाम ढोले आणि राजेंद्र ढोले यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. यानुसार पुजाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी रात्री उशिरा विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टीईटी पेपरफुटीप्रकरणी शिक्षक क्रांती संघटना आक्रमक; परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी

Maharashtra Politics: विमानापेक्षा इमान महत्वाचा...; ठाकरे-फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासावरून शिंदे संतापले

Rohit Shetty: रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; 20 कोटींच्या खंडणीची मागणी अन्..., नेमकं काय घडलं?

Hair oil benefits: जर तुम्ही महिनाभर केसांना तेल लावलं नाही तर काय होऊ शकतं?

Karjat Fort : कर्जतमध्ये लपलाय मराठा साम्राज्यातील महत्त्वाचा किल्ला, शत्रूंच्या हालचालींवर ठेवायचे बारीक लक्ष

SCROLL FOR NEXT