धक्कादायक : आईने गाडी घ्यायला पैसे दिले नाही म्हणून, लहान भावाची केली गळा दाबून हत्या SaamTV
महाराष्ट्र

धक्कादायक : आईने गाडी घ्यायला पैसे दिले नाही म्हणून, लहान भावाची केली गळा दाबून हत्या

भावाला वैद्यकीय उपचारासाठी पैसे लागतात म्हणून आई मला पैसे देत नाही. आणि भावामुळे मला नवीन गाडी घेता येत नाही हा राग हेमंतने मनात ठेवला आणि त्याने या रागाच्या भरात आईसोबत कडाक्यांचे भांडण केले.

अभिजित घोरमारे

गोंदिया : गोंदिया (Gondiya) जिल्हातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत शिवनी येथे आईने नवीन गाडी घेण्यास पैसे दिले नाहीत, हा राग मनात घेऊन मोठया भावाने चक्क आपल्या लहान मतिमंद भावाचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हे देखील पहा -

मला गाडी घेण्यासाठी पैसे पाहिजेत यासाठी हेमंत डोये वय 23 वर्ष याने त्याच्या आईजवळ हट्ट धरला होता, परंतु हेमंतची आई छगनबाई यांनी हेमंतचा लहान भाऊ भुवन डोये हा मतिमंद असल्याने त्याच्यावरती वैद्यकीय खर्च जास्त होत असल्याचे सांगून आता पैसे नाहीत असं सांगंत आईने नवीन गाडी घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला.

मात्र भावाला वैद्यकीय उपचारासाठी पैसे लागतात म्हणून आई मला पैसे देत नाही. आणि त्या भावामुळे मला नवीन गाडी घेता येत नाही हा राग हेमंतने मनात ठेवला आणि त्याने या रागाच्या भरात हेमंत याने आपल्या आईसोबत कडाक्यांचे भांडण केले "मी तुला आज मारून टाकीन" अशी धमकी आपल्या आईला दिली होती या मुलाच्या धमकीला घाबरुन आई बाजूच्या घरी झोपायला गेली मात्र नराधन हेमंतने 19 वर्षीय मतिमंद असणाऱ्या भुवन डोये या भावाची रात्रीच्या सुमारास गळा दाबून हत्या केली. दरम्यान ही धक्कादायक घटना सकाळी उघड झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली. आमगांव पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT