प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिका संघटना सरकार विरोधात आक्रमक भूषण अहिरे
महाराष्ट्र

प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिका संघटना सरकार विरोधात आक्रमक

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे आज धुळ्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण अहिरे

धुळे : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे आज धुळ्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले. गेल्या कित्येक महिन्यांपासून परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वेळोवेळी शासनाला निवेदन देऊन प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी परिचारिकांतर्फे करण्यात आली होती. The nurses' union is aggressive against the government for its pending demands

हे देखील पहा -

परंतु कोविड काळात देखील मोठ्या धैर्याने काम करणाऱ्या परिचारिकांना शासनातर्फे फक्त आश्वासने देण्यात आली. प्रशासनाने परिचारिकांच्या कुठल्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत त्यामुळे संतप्त परिचारिकांनी अखेर आजपासून संपूर्ण राज्यामध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी संघटनेतर्फे सर्व परिचारिकांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी देखील केली असून लवकरात लवकर शासनाने परिचारिकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्या परिचारिकांनी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान

Chakolya Recipe : 'चकोल्या' ही रेसिपी कधी खाल्ली आहात का? फक्त खमंग वासानेच पोट भरेल

Shocking : ७ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, नामांकित मॉलच्या बेसमेंटमध्ये आरोपीचं भयंकर कृत्य

Office Tips : मीटिंगमध्ये सगळ्यांसमोर बॉस तुमच्यावर ओरडतो? 'या' ८ टिप्स नक्की फॉलो करा

SCROLL FOR NEXT