Viral Video Saam TV
महाराष्ट्र

Viral Video: वरातीत नाचताना ती नवरदेवाच्या अंगावर पडली; लग्न मंडपाऐवजी सगळ्यांनी हॉस्पीटलमध्ये घेतली धाव, पाहा नेमकं काय घडलं...

नवरदेवाने केलेला हा प्रताप पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video: लग्न म्हटल्यावर कुटुंबातील सर्वच व्यक्ती आनंदात असतात. अनेक जण आपल्या लग्नात सर्वांच लक्ष वेधून घेण्यासाठी दमदार एन्ट्री करतात. यात कोणी पालखीत बसून तर कोणी घोडी किंवा बुलेटवर येतात. अनोख्या आणि दमदार अशा अनेक एन्ट्री आजवर तुम्ही पाहिल्या असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक लग्नातील एन्ट्रीचा व्हिडिओ समोर आला आहे. यात नवरदेवाची अशी काय फजिती झाली आहे की, लग्नमंडपात जाण्याऐवजी वरात हॉस्पीटलमध्ये पोहचली आहे. (Latest Viral Video)

लग्नात आपण सगळ्यांपेक्षा रुबाबदार दिसावे असे या नवरोबाला वाटत होते. त्यामुळे तो घोडीवर स्वार होत लग्न मंडपात एन्ट्री करतो. नवरदेव घोडीवर बसून आल्याने सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळतात. आता हा नवरदेव एवढ्यावर शांत बसत नाही. पुढे तो असं काही करतो की, त्याचा स्टंट त्याच्या चांगलाच अंगाशी येतो. नवरदेवाने केलेला हा प्रताप पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवरदेवाला दुचाकी उडवून जसा स्टंट केला जातो तसा काहीसा स्टंट करायचा आहे. मात्र हा स्टंट त्याला घोडीबरोबर करण्याची इच्छा असते. त्यामुळे तो जोरात दोरी खेचतो. यात घोडी देखील वर उडी घेत त्याला साथ देत. मात्र त्यांचा हा स्टंट फसतो. घोडीचा पाय सरकतो आणि ती थेट नवरदेवाच्या अंगावर उलटी पडते. यात नवरदेवाच्या हाडांचा पार चूरा होतो.

घटना घडताच लग्न मंडपात सगळीकडे धावपळ सुरू होते. नवदेवाला चांगलाच मार लागल्याने लग्न मंडपात रुग्णवाहिका बोलावली जाते आणि सर्व जण हॉस्पीटलमध्ये पोहचतात. लग्नातल्या स्टंटचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात नवदेवाचा प्रताप पाहून नेटकरी लोटपोट हसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firecracker Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

Bribe Case : नवी मुंबईत खळबळ; महापालिका मुख्यालयातच उपायुक्ताला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

NalaSopara Tourism : 'नालासोपारा'जवळील ५ विरंगुळ्याची ठिकाणे, वीकेंडला करा लहान मुलांसोबत धमाल

'तुझी फिगर झिरो, गुढी पाडव्याला साडी खेचली, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य, TCS धर्मांतर प्रकरणातील पीडितेचा हादरवणारा जबाब

Maharashtra News Live Update: धुळे मनपा आयुक्तांचा आक्रमक पवित्रा, कर्तव्यात कसूर करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांचं निलंबन

SCROLL FOR NEXT