Beed News
Beed News Saam TV
महाराष्ट्र

रात्रभर हिटर राहिला सुरु, उकळत्या पाण्यामुळे फुटली टाकी; झोपेत असतानाच विवाहितेवर काळाचा घाला

विनोद जिरे

बीड: हिटरमधील उकळते पाणी झोपलेल्या महिलेच्या अंगावर पडल्याने ३१ वर्षीय विवाहित महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना बीडच्या (Beed) पिंपळगाव येथे आज सकाळी घडली आहे. उषा रंजीत सुरवसे राहणार असं मयत विवाहित महिलेचे नाव आहे.

आजकाल अनेकजण अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी विद्यूत हिटरचा (Electric Heater) वापर करतात. मात्र, या हिटरचा काळजीपुर्वक वापर न केल्यास आपल्याला जीव देखील गमवावा लागू शकतो. याच उदाहरण समोर आलं आहे.

पाहा व्हिडीओ -

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या दरम्यान उषा सुरवसे झोपल्या होत्या. मात्र, पाणी गरम करण्यासाठी हिटर सुरु केलेला बंद न केल्यामुळे, रात्री तीन वाजेदरम्यान प्लॅस्टिकची टाकी उकळत्या पाण्यामुळे फुटली आणि उकळलेले सर्व पाणी झोपलेल्या उषा यांच्या अंगाखाली आले आणि यातच त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.

जखमी उषा सुरवसे यांच्यावर आंबेजोगाई येथील स्वाराती शासकीय रुग्णालयात (Government Hospital) उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान मयत उषा सुरवसे यांच्या पश्चात पती, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, विद्युत उपकरणांचा वापर करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, त्यामध्ये हिटर, वाफारा घेण्याचे भांडे वा इस्त्री काळजीपुर्वक बंद करावी अन्यथा एखादी दुर्घटना घडू शकते.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case : 'माझ्याबाबत जे घडलं ते,...; मारहाणीच्या घटनेनंतर आप नेत्या स्वाती मालीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

Mega block : मध्य रेल्वेवर आजपासून पंधरा दिवस ब्लॉक; कोणत्या मार्गांवर होणार परिणाम? जाणून घ्या

Maharahstra Election: अजित पवार गेले कुठे? अखेरच्या टप्प्यात अजित पवारांची प्रचाराकडे पाठ?

Shirur Lok Sabha Election 2024: हडपसर ठरवणार शिरूरचा खासदार?, संसदेत कोण जाणार कोल्हे की आढळराव?

Maharashtra Politics 2024 : मोदींच्या सभेत कांद्यावरून गोंधळ; नाशिकच्या भाषणात तरुणाची घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT