कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह मुलगी तलावात बुडाली; 12 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यु लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह मुलगी तलावात बुडाली; 12 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यु

तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह 12 वर्षांची मुलगी बुडल्याची घटना आज दुपारच्या सुमारास अंबड तालुक्यातील रामनगर तांडा या गावात घडली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह 12 वर्षांची मुलगी बुडल्याची घटना आज दुपारच्या सुमारास अंबड तालुक्यातील रामनगर तांडा या गावात घडली आहे. कपडे धुत असताना पाण्याची बकेट तलावात बुडू लागली. बकेट पकडण्यासाठी गेलेली महिला आणि 12 वर्षाच्या मुलीला पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या.

हे देखील पहा :

तलाव परिसरातून जाणाऱ्या एका नागरिकांनी पाण्यात उडी घेऊन दोघींना दोघीना बाहेर काढून उपचारासाठी अंबड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी 12 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यु झाल्याचे जाहीर करताच परिसरात शोककळा पसरली आहे.

महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर आयसीयू वार्डात उपचार सुरू आहेत. या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूची माहिती कळताच संपूर्ण रामनगर तांडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

राष्ट्रवादीकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर; सुनेत्रा पवारांनी सतीश चव्हाणांना पुन्हा दिली संधी

गोकुळ निवडणुकीवरून राजकारण रंगलं, जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच

ज्ञानेश कुमारांना मोठा धक्का, 20 वर्षे जुन्या प्रकरणात गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT