विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पहिल्यांदाच होणार स्ट्रक्चरल ऑडिट  भारत नागणे
महाराष्ट्र

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पहिल्यांदाच होणार स्ट्रक्चरल ऑडिट

पुरातत्व विभाग आणि मंदिर समितीच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत नागणे

पंढरपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे मुळ स्वरुपातील सौंदर्य अबाधित ठेवत, मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

संपूर्ण विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्रथमच स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. यामध्ये संत नामदेव पायरी पासून विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंतच्या मुळ मंदिरामध्ये आवश्यक ते बदल देखील केले जाणार आहेत. यासाठी पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार डीपीआर तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. The first structural audit of Vitthal-Rukmini temple will be held

संत नामदेव पायरीचे देखील सुशोभीकरण केले जाणार आहे, अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्यांची आज येथील नवीन भक्त निवासामध्ये बैठक झाली.

बैठकीमध्ये मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या संदर्भात येत्या 12 जुलै रोजीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर हे पुरातन आहे, मंदिराला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. मंदिर कोणी आणि कधी बांधले याबाबतची ठोस अशी माहिती उपलब्ध नाही.

परंतु बांधकाम कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या या मंदिराचा ऐतिहासीक ठेवा पुढील अनेक वर्षे जतन करण्यासाठी मंदिर समितीने आवश्यक ती पाऊले उचलली आहेत. मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी यापूर्वीच पुरातत्व विभागाने अनेक बदल सुचवले आहेत. त्यानुसार मंदिर समितीने मंदिरातील व देवाच्या गाभाऱ्यात आवश्यक ते बदल देखील केले आहेत.

आणखी काही बदल सुचवले तर ते करण्यासाठी संपूर्ण मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संत नामदेव पायरीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण मह्त्व आहे. पंढरपुराला येणारा प्रत्येक भाविक संत नामदेव पायरीचे दर्शन घेवूनच परत जातो. येथील संत नामदेव पायरीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सुशोभीकरण करण्य़ाचाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

बैठकीला मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, साधना भोसले, मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्व विभागाचे अधिकारी वाहणे आदी उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT