Nagpur Crime संजय डाफ
महाराष्ट्र

बाईक आणि कुलरसाठी पोटच्या मुलीला विकलं; निर्दयी बापाचं कृत्य

मुलीला विकून या स्वार्थी बापाने बाईक, होम थिएटर आणि कुलर खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपुरात (Nagpur) पोटच्या मुलीला वडिलांनी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या मुलीला विकून या स्वार्थी बापाने बाईक, होम थिएटर आणि कुलर खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशन (Pachpavli Police Station) हद्दीतील राणी दुर्गवती चौकात भंडारा जिल्ह्यातून कामाच्या शोधत आलेलं एक दाम्पत्य राहतं होते. हे पती-पत्नी दोघं मोलमजुरीची काम करत होते. मात्र पती उत्कर्ष दहिवले हा दारुडा होता. त्यानं दुसरं लग्न केलं होतं. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगी आहे. दुसऱ्या पत्नीपासूनही मुलगी झाल्यानं तो नाराज होता. त्यामुळं त्याने मुलीला विकण्याचा कट रचला.

दरम्यान, त्याच्या संपर्कात उषा सहारे नावाची महिला आली आणि तिने त्याला पैसे मिळवून देण्याचं अमिश दाखवीलं. ती खाजगी अनाथ आश्रमात काम करते. तिने उमरेड मधील एका गरजू दाम्पत्याला पकडलं आणि 70 हजार रुपयात बाळाचा सौदा केला. मात्र बाळाच्या आईला याची माहिती मिळताच तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दिली. पोलिसांनी बाळाच्या पित्याला आणि दलाल महिलेला याप्रकरणी अटक केलीय, याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी वडिलांसह मध्यस्थी करणाऱ्या महिलेला अटक केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT