ST बंद म्हणून नवऱ्याला घ्यायला बोलावलं; सासरी जाताना चोरट्यांनी भर रस्त्यात लुटलं ! SaamTV
महाराष्ट्र

ST बंद म्हणून नवऱ्याला घ्यायला बोलावलं; सासरी जाताना चोरट्यांनी भर रस्त्यात लुटलं ! (Video)

ST बस चालू असती तर आमच्यासोबत हे घडलं नसतं. हे सांगत असताना महिलेला अश्रू अनावर झाले होते.

विनोद जिरे

बीड : उस्मानाबाद मार्गे बीडकडे Beed दुचाकीवरुन येणाऱ्या दांम्पत्याला, तिघा जणांनी दुचाकी आडवी लावून लुटल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या चौसाळा परिसरात घडलाय. ही घटना रविवारी सायंकाळच्या दरम्यान घडली. यामध्ये चोरट्यांनी विवाहित महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांसह पैसे घेऊन पोबारा केला आहे.

पहा व्हिडीओ -

ही घटना घडल्यानंतर पीडीत दाम्पत्यांने, बीडच्या बसस्थानकातील आंदोलनस्थळी येऊन आपल्यासोबत घडलेली सर्व प्रकार सांगितली. यावेळी पीडित नम्रता धनुरे म्हणाल्या, 'मी सणासाठी माहेरी गेले होते. मात्र येताना ST बंद असल्यामुळे मी माझ्या पतीला बोलावलं. यावेळी आम्ही बीडकडे येत असताना, चौसाळा जवळ आम्हाला दुचाकी आडवी लावली. यावेळी तिघा जणांनी येऊन आम्हाला चाकू दाखवला, आम्हाला खाली लोटलं आणि सोनं काढून दे म्हणाले. यावेळी माझा मुलगा रडत होता. मी लगेच गळ्यातील सोनं काढून दिलं, आमच्या पिशव्या देखील ते गुन्हेगार घेऊन गेले असल्याच सांगितलं.

तसेच जर आज एसटी चालू असती, तर आमचं सोनं गेलं नसतं, आम्हाला मारलं नसतं. आज बस बंद असल्यामुळे आमच्यावर ही परिस्थिती आली, त्यामुळे सरकारने हा बंद गांभीर्याने घ्यावी आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य प्रवाशांना यातून बाहेर काढावं. अशी मागणी पीडित महिला नम्रता धनुरे यांनी केली आहे. दरम्यान यावेळी नम्रता धनुरे यांना अश्रु अनावर झाले. दरम्यान बस बंद असल्याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होत असताना आता चोरटे देखील याचा फायदा घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी बीडच्या नेकनुर पोलिस ठाण्यामध्ये (Neknur Police Station) गुन्हा दाखल झाला असून पोलीस घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT