बांधकाम विभागाने पोलीस निवासस्थान ठरविले धोकादायक; वास्तव्यास असलेली कुटुंबीय होणार बेघर ! संदीप नागरे
महाराष्ट्र

बांधकाम विभागाने पोलीस निवासस्थान ठरविले धोकादायक; वास्तव्यास असलेली कुटुंबीय होणार बेघर !

हिंगोली मध्ये जुन्या पोलीस वसाहतीतील पोलीस कर्मचाऱ्यांची १२६ घरे बांधकाम विभागाने धोकादायक अवस्थेत असल्याचे घोषित केले आहेत.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : हिंगोली Hingoli मध्ये जुन्या पोलीस वसाहतीतील Police colony पोलीस कर्मचाऱ्यांची १२६ घरे बांधकाम विभागाने धोकादायक अवस्थेत घोषित केली. या वसाहतीत वास्तव्यास असणाऱ्या ८२ पोलीस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना हिंगोली जिल्हा पोलीस दलाने इमारती धोकादायक असल्याबाबत नोटीस Nitice बजावली आहे. The construction department declared the police residence was dangerous

त्यामुळे अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी या धोकादायक इमारती मधून बाहेर पडावे लागत आहे . ऐन पावसाळ्यात, कुणी घर देता का घर असे म्हणत इतरत्र घर शोधायला त्यांनी सुरुवात करावी लागणार आहे.

हे देखील पहा-

गेल्या दहा वर्षां पासून यातील अनेक पोलीस कर्मचारी या ठिकाणी वास्तव्यास आहेत. मात्र ही घरे आता धोकादायक झाली असल्याचे पोलिस दलाने सांगितल आहे. मात्र, आम्हाला इतरत्र तातडीनं निवासस्थान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडेे केली आहे.

विशेष बाब म्हणजे ८२ कुटुंब राहतअसलेली जी निवासस्थाने धोकादायक ठरविण्यात आली आहेत, त्यातील अनेक निवासस्थाने ही चांगल्या स्थितीत आसल्याचे या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या पोलिसांनी सांगितले आहे. मात्र ही निवासस्थाने देखील धोकादायक असल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला आहे. तसेच याबाबत नोटीस देण्यात आल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी सांगितले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gayatri Datar Mangalsutra Design: शिव-शक्तीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं! गायत्री दातारच्या 'दोन वाट्यांच्या' मंगळसूत्राने वेधलं लक्ष

Maharashtra News Live Update: सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी सभा

PM Modi Plays Football: प्रचार थांबताच पंतप्रधान मोदी सिक्कीममध्ये, मुलांसोबत खेळले फुटबॉल, पाहा फोटो

BOB Recruitment: कोणतीही परीक्षा नाही, थेट बँक ऑफ बडोदात नोकरी; भरघोस पगार मिळणार; अर्ज कधीपर्यंत करता येणार? वाचा

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा 24k, 22k, 18k सोन्याचे दर

SCROLL FOR NEXT