Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

फडणवीसांनी मुख्यमंत्री दलित समाजाचा करावा; RPI खरात गटाची मागणी

आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राजीनामा सोपविल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या (BJP) गोटात आनंदाचं वातावरण आहे. राज्यात लवकरच भाजपची सत्ता येईल, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी चर्चा सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री दलित समाजाचा करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाने केली आहे. (Devendra Fadnavis Latest News)

'महाराष्ट्र राज्यात अनेक हिंदू दलित आहेत. भाजपा पक्ष आणि देवेंद्र फडणवीसजी तुम्ही भारतात आणि महाराष्ट्र राज्यात हिंदुत्वाची संकल्पना मांडत असता आणि हिंदुत्वाची शाल पांघरून हिंदू दलितांची मते घेऊन सत्ता मिळवता. फडणवीसजी खरोखरच हिंदू दलितांबद्दल थोडीशी जरी सहानभूती असेल तर आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये हिंदू दलित असेल तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी दलित व्यक्तीला बसवावे, जेणेकरून तुम्ही एका जातीचे पुरस्कर्ते नाही हे सिद्ध होईल', असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष करत आहे. (Eknath Shinde News)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदें गटाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र या सरकारमध्ये मंत्री कोण होणार याची उत्सुकता आता सर्वांनाचा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांना मोठी खाती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार आहे. यात मंत्रीपद वाटपाचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

आज सकाळी १० वाजता भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा होणार आहे. या चर्चेत नव्या मंत्रिमंडळा संदर्भात चर्चा होणार आहे. आज दुपारपर्यंत नव्या मंत्रिमंडळाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. यानंतर १२ वाजता शिंदे गटाची बैठक होणार आहे, असी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडीमध्ये मोठी बातमी: महापौर निवडणुकीत राजकीय उलथापालथ

SSC Exam : दहावीचा पेपर सुरू असताना शिक्षकांमध्येच राडा; गुरूजी गंभीर जखमी, नेमकं काय झालं?

Shocking : संभाजीनगर हादरले! PSI चे २१ वर्षाच्या मुलीसोबत लॉजवर बळजबरीने शरीरसंबंध, पुण्यात तीनवेळा गर्भपात

Peacock Feather Meaning: मोराचे पीस सापडणे शुभ संकेत की मोठा इशारा… जाणून घ्या सत्य

Black Thread Anklets: मुलींच्या पायात काळा धागा का असतो?

SCROLL FOR NEXT