Nashik Crime News In Marathi अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

Nashik: प्रियकर दुसरीकडे लग्न जमू देत नव्हता म्हणून प्रेयसीनेच त्याला जिवंत जाळले!

प्रेमप्रकरणातून तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झालाय. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील लोहणेरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक: प्रेमप्रकरणातून तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झालाय. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील लोहणेरमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. आज  सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडली. यामुळे तालुकाभरात खळबळीचे वातावरण आहे. या घटनेचा देवळा पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. (Nashik Crime News In Marathi)

देवळ्यातील गोरख काशिनाथ बच्छाव याचे एका मुलीशी तीन वर्षांपासून ओळख होती. या प्रकरणात एकतर्फी प्रेमाची शक्यता वर्तवली जात आहे. युवक या मुलीचे लग्न मोडत होता. या रागातून मुलीचे आईवडील, दोन भाऊ आणि मुलीने लोहोणेर ग्रामपंचायत समोर गोरख बच्छाव यास मारहाण केली.

हे देखील पहा-

त्यात संताप अनावर झाल्याने मुलीने ज्वालाग्राही इंधन फेकून मुलाला जाळण्याचा प्रयत्न केला. यात तो पन्नास टक्के भाजला असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलय. प्रेमप्रकरणातून झालेल्या या वादात मुलगी, आई, वडील आणि दोन भाऊ यांनी संगनमताने मुलाच्या डोक्यात वार करुन मुलीने अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी मुलीसह पाच आरोपी ताब्यात घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Maharashtra News Live Update: पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT