Bhandara News  Saam TV
महाराष्ट्र

Bhandara: आईला शिव्या दिल्या म्हणून मुलाने केला वडिलांचा खून!

घटनेच्या दिवशी असेच मृतक बाबूराव याचे आपल्या पत्नीशी जोरदार भांडण झाले.

अभिजीत घोरमारे

भंडारा: आईला शिव्या दिल्या म्हणून मुलाने लाकडी दांड्याने वार करत वडिलांचा खून केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी येथे घडली आहे. बाबुराव काहालकर वय 68 वर्षे असे मृतकाचे नाव असून मंगेश काहालकर वय 28 वर्ष असे आरोपी मुलाचे नाव आहे. ह्या प्रकरणी पालांदुर पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा नोंद करुन अटक केली आहे. आरोपी मंगेश हा आपल्या आई वडिलांसह येथे राहत असून वडिलांचे दारूच्या नशेत मुलासोबत अनेकदा वाद व्हायचा.

घटनेच्या दिवशी असेच मृतक बाबूराव याचे आपल्या पत्नीशी जोरदार भांडण झाले. यात वडील आईला शिव्या देत असल्याने रागाच्या भरात मंगेश ने आपल्या वडिलांना लाकडी दांड्याने मारहाण केली. यात वडिल गंभीर जखमी झाल्याने त्याच्या जागेवर मृत्यु झाला. या घटनेत फिर्यादी आरोपीची आईच्या सांगण्यावरुन पालांदूर पोलीस ठाण्यात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला मुलाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने खराशी गावात खळबळ उडाली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपर लीक प्रकरण; 20 दिवसापासून सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून

डायबिटीजच्या रूग्णांसाठी धोक्याची घंटा! 'या' 5 वाईट सवयींमुळे वाढू शकते रक्तातील साखर

Accident News: सात जन्मांच्या शपथा काही तासांतच तुटल्या! हनिमूनसाठी उड्डाण, पण परतलाच नाही; पत्नीसमोरच पतीचा मृत्यू

राजकीय संघर्ष पेटला! विरोधी पक्षाच्या खासदाराचं ऑफिस फोडलं, राजकीय वर्तुळात खळबळ

Shocking : गर्लफ्रेंडनं शरीरसंबंध ठेवले, नंतर बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला; धक्कादायक कारण उघड

SCROLL FOR NEXT