अविनाश कानडजे -
औरंगाबाद : औरंगाबाद शहर पोलीस दलातील (Aurangabad city police force) एक पोलिस कर्मचारी सहा दिवसांपासून बेपत्ता होते. सहा दिवसानंतर या बेपत्ता पोलिस कर्मचाऱ्यांचा पोलिस मुख्यालयातील देवगिरी मैदानाजवळ असलेल्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. हा अपघात आहे की आत्महत्या हे स्पष्ट होऊ शकले नाही. संजय फकीरराव गाडे (Sanjay Gade) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, संजय गाडे हे औरंगाबाद शहर पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर होते. 26 जानेवारी रोजी सकाळी ते आपल्या घरून कर्तव्यावर जात असल्याचे सांगून बाहेर पडले होते. त्याच दिवशी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुख्यालयात मुलाची भेट घेऊन त्यांचे ATM कार्ड मुलाला दिले. मात्र संध्याकाळी पाच वाजेपर्यंत गाडे घरी न आल्याने त्यांच्या पत्नीने मुलाला कळविले. त्यांचा शोध घेण्यात आला त्या वेळेस त्यांची दुचाकी पोलिस मुख्यालयातच मिळून आली.
यादरम्यान त्यांच्या जवळ असलेला मोबाईल सुद्धा बंद होता. बरीच शोधाशोध केल्यानंतर बेगमपुरा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती. पोलिसांना त्यांचा शोध लागला नव्हता. मात्र काल मैदानावर काही मुले खेळत असताना त्यांना विहिरीच्या बाजूने दुर्गंधी येत असल्याने त्यांनी प्रशिक्षक तडवी यांना माहिती दिली.
तडवी यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत मृतदेह दिसून आला. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला त्यानंतर गाडे यांचा मुलगा किशोर यांनी मृतदेह आपल्या वडिलांचा असल्याचं सांगितले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.