धबधब्याने खुलले मुक्तागिरीचे सौंदर्य ! अरुण जोशी
महाराष्ट्र

धबधब्याने खुलले मुक्तागिरीचे सौंदर्य !

अमरावती जिल्ह्यातील परतवाडापासून १० किमी अंतरावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत मुक्तागिरी धबधबा आहे.

अरुण जोशी

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडापासून १० किमी अंतरावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेलगत मुक्तागिरी धबधबा आहे. सध्या परतवाडा परिसरात झालेल्या पावसाने हा धबधबा निसर्ग सौंदर्याने फुलला आहे. नाग नदीवरून वाहणारा हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

हे देखील पहा -

निसर्गाच्या सानिध्यात आणि धबधब्यातून पडणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्याचा आनंद घेण्यासाठी मुक्तागिरीत पर्यटक हळूहळू दाखल होत आहेत. येथील हिरव्यागार वनराईने व धबधब्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे. तसेच या ठिकाणी जैन धर्मीयांचे श्रध्दास्थान असल्याने या भागात पर्यटक गर्दी करू लागले आहेत.

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरापासून काहीच अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वत रांगेत अतिप्राचीन मंदिरालगत जवळपास २५० फूट उंचावरून मध्यप्रदेशातून वाहत येणारी नाग नदीची धार कोसळते. उंचावरून धबधब्याच्या रूपाने कोसळणारे पाणी त्याचप्रमाणे पाण्यातून उडणारे तुषार या सर्वाचा आनंद येथे पर्यटक घेत असतात. मात्र, सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन बंदी असल्याने दरवर्षीप्रमाणे होणारी गर्दी येथे पाहायला मिळत नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT