Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik : अंगाशी आली स्टंटबाजी! नागाच्या चुंबनाचा प्रयत्न सर्पमित्राच्या जीवावर बेतला

शरीरात विष पसरल्याने सर्पमित्राचा मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक - सिन्नर शहरातील सर्पमित्राचा पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाबरोबर (Snake) स्टंट करत असताना ओठांना दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

नागेश भालेराव अस मृत सर्पमित्राच नाव आहे. नागेश भालेराव हा शहरातील वेल्डींग वर्कशॉपमध्ये तसेच होर्डींग चिकटवण्याचे काम करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी एका ठिकाणी पकडलेला कोब्रा जातीचा नाग त्याने सिन्नर महाविद्यालयासमोरील मित्राच्या कॅफेमध्ये आणला. (Nashik Latest Update News)

कॅफेच्या वरती बिल्डींगच्या गच्चीवर जात नागेश याने मित्रांसमोर नागाचे चुंबन घेण्याच्या प्रयत्न केला असता नागाने त्याच्या ओठांना दंश केला. त्यानंतर त्याच्या मित्रांंनी त्याला उपचारांसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपुर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भालेराव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

अनेक तरुण सर्पमित्र प्रसिद्धीसाठी सापांसोबत असे सेल्फी काढून घेतात. याचे फॅड दिवसेंदिवस वाढत चालेल आहे. काहीतरी हटके केले की आणखी प्रसिद्धी मिळते असा यांचा गैरसमज असतो. यातूनच नागेशला आपला जीव गमवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे फेस्टिव्हलचे १८ सप्टेंबरला उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Rain Alert : दहीहंडीच्या उत्सवावर पावसाचे सावट! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार; वाचा हवामानाचा अंदाज काय

Limbu Pani Benefits : किडनी स्टोन सारख्या आजारांवर बेस्ट उपाय, लिंबू पाणी पिण्याचे 'हे' ६ फायदे जाणून घ्या

Saturday Horoscope : जन्माष्टमीला या 5 राशींचे नशीब चमकणार! श्रीकृष्णाच्या कृपेने होणार धनलाभ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळली, विजय वडेट्टीवार 'डाव' उलटवण्याच्या तयारीत; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT