सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर 
महाराष्ट्र

कोरोनाबाधित आरोपी सिव्हिल हॉस्पिटलमधून पळाला

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोना झाल्याने उपचार कक्षातून नगर जिल्ह्यात आतापर्यंत अनेकांनी धूम ठोकल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, खुनाच्या गुन्ह्यातील एका आरोपीने पोलिसांना गंडवून रूग्णालयातून हातावर तुरी दिल्या आहेत. सायंकाळपासून या आरोपीची शोधाशोध सुरू आहे. या आरोपीला पोलिसांनी शिताफीने पकडले होते. मात्र, तोच पुन्हा परागंदा झाला आहे.

राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर खून प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे (वय ४६, रा. वांबोरी) याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आज (शनिवारी) सायंकाळी सव्वापाच वाजता नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनावरील उपचारादरम्यान धूम ठोकली आहे. जिल्हाभरातील पोलिस यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. The accused escaped from the Civil Hospital abn79

सहा एप्रिल रोजी दुपारी सव्वाबारा वाजता पत्रकार दातीर यांचे अपहरण, जबर मारहाण करून खून करण्यात आला. याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी कान्हू मोरे घटनेनंतर बारा दिवस दक्षिण भारतात पसार झाला होता. पैसे संपल्याने तो नेवासे फाटा येथे एका हॉटेलजवळ वेषांतर करून आला होता.

पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शिताफीने त्याला अटक केली होती. दहा दिवस पोलिस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी आरोपी मोरे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याची रवानगी नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आली. त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात येणार होते. आज (शनिवारी) सायंकाळी सव्वापाच वाजता लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने त्याने जिल्हा रुग्णालयातून नगर पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली.The accused escaped from the Civil Hospital abn79

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT